अशी कशी बदललीस तू...

अशी कशी बदललीस तू...
आपले नाते आता....
एवढेच बोललीस तू...
असे अचानक...
अशी कशी बदललीस तू...

रोज माझी वाट पाहायचीस...
मी येणार्‍या वाटेवर...
नजर लावून बसायचीस....
क्षण क्षण वेळेवर...

उशिर झाला की चिडायचीस...
मी उशिरा आलो म्हणून...
ओढणीने घाम पुसायचिस...
दमुन आलो म्हणून....

आता तुझी भेट होत नाही...
दिसलो तरी रस्ता बदलतेस तू...
त्याच वाटेवर असताना मी ही...
अशी कशी बदललीस तू...

उशिर झाला रिप्लाय ला..
तर व्हायचीस कासाविस...
एका मागोमाग असायचे...
तुझे मेसेज तीस....

उत्तर माझे येताच....
रुसुन बसायचीस...
अन मी मनवतो का...
याची वाट पाहायचीस...

आता मात्र तुला ....
माझ्याशी बोलायला वेळच नाही...
बोलावे म्हटले तर टाळतेस तू...
सांग सये अशी कशी बदललीस तू...

माझ्या प्रत्येक शब्दावर..
खुलायची तुझी कळी...
हसता हसता मग उमटायची...
गालावर गोड खळी...

हसरा चेहरा पाहुणं तुझा...
मन भरुन यायचे...
अन हळूच मग हृद्याचे..
ठोके वाढायचे....

आता माझा प्रत्येक शब्द...
तुला परका वाटतो....
प्रत्येक शब्दावर माझ्या नाक मुरडतेस तू...
का सये आता, असे वागतेस तू.....
सांग सये अशी कशी बदललीस तू...
©*मंथन*™.. ०३/०६/२०१५


Post a Comment

Previous Post Next Post