दोन वर्षे माझ्या शब्दांची...



नमस्कार मित्र मैत्रीणींनो,

शब्द झाले माझे सारथी...
या विरहाच्या वाटेवर..
आता बघू अशीच साथ...
देतात मला ते कुठंवर...

हे शब्द वेचता वेचता कधी दोन वर्षे उलटून गेली कळलेच नाही. मी माझे शब्द, माझ्या भावना, मनातले भाव कधी असे शब्दांमध्ये मांडेन असे वाटले नव्हते. कविता चारोळ्या वाचने त्यांचा संग्रह करणे मला आधी पासुन आवडायचे पण मी स्वत: कधी लिहिन असे स्वप्नात देखिल वाटले नव्हते, असो जे कधी करणार नाही असे वाटले होते ते करुन बसलो मग ते प्रेम असो वा कविता. आता तुम्ही म्हणाल मी प्रेम हा शब्द हा म्हटला, अहो प्रेम अन कविता या दोन गोष्टी मी कधी करेन असे वाटलेच नव्हते.

शब्दांची गोडी होतीच मला पण,
त्यांना स्वत: पाकात घोळणे तिनेच शिकवले.
लिहिलेले शब्द वाचायला आवडायचे मला..
पण त्यांना स्वत: लिहायला तिनेच शिकवले..

मी माझा पहीला शब्द जोडला १५ फ़ेब्रुवारी २०१० ला, आज दोन वर्षे झाली... या दोन वर्षात खुप लिहिले, मनातल्या भावना, तिच्या बद्दल चे प्रेम अन थोडा तिरस्कार ही शब्दात मांडला. तरीही मन तिला विसरायला तयार नाही. वाटले होते तिचा तिरस्कार केला तर कदाचित विसरेन तिला, अन त्याच वाटेवर जे वाटले ते लिहित गेलो. त्या पैकी तुम्हाला काही आवडले, काही नाही, काही खटकले हि. कधी प्रेम, कधी विरह, कधी दोन जिवांना एक करणारया चारोळ्या... तर कधी मिठी तर कधी ओठ, मिठी अन ओठ या विषय़ी काही जास्त माहीती नाही अन मला तो अनुभव ही नाही तरी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला.. अन माझा हा शब्दांचा प्रवास असाच चालू राहील...अन या पुढेही तुम्ही अशीच साथ मला अन माझ्या शब्दांना द्याल... :)

माझ्या शब्दांनी शिकवले मला...
स्वत:साठीही जगायचं असते...
आपण कुणाचे नसलो तरी..
कुणीतरी आपले असते....

आज मी लिहिलेले पहिली चारोळी जि लिहिली होती १५ फ़ेब. २०१० ला तुमच्या समोर मांडत आहे. जी मी तिच्यासाठी लिहिली होती अन तीला ही त्या शब्दात सामावून घेण्याचा प्रयत्न केला होता.

तू माझ्या पासुन दुर जाताना...
जगण्यातला रस निघुन गेला..
आता उरलो फ़क्त "मी"
अन माझा श्वास ही तुटून गेला...
©*मंथन*™.. १५/०२/२०१०
प्रशांत पवार, घाटकोपर (प) मुंबई.
©*मंथन*™.. १५/०२/२०१२

Post a Comment

Previous Post Next Post